असं मानूया की आम्ही ७५ वर्ष जगतो. एका दिवसात २४ तास असतात, ज्यामध्ये
- आपण एका दिवसात आठ तास झोपतो, जे आपल्या आयुष्यातील २५ वर्ष असतात.
- आपण महाविद्यालय/शाळा/नोकरीमध्ये दररोज ८ तास घालवतो,जे आपल्या आयुष्यातील २५ वर्ष असतात
- आपण घरातील दैनंदिन कामात जसं की खाणे, आंघोळ करणे, टीव्ही पाहणे, वाचणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे इत्यादींसाठी दिवसातील ४ तास घालवतो जी आपल्या जीवनातील १२.५ वर्ष असतात.
- आपण घराबाहेरील काम जसे यात्रा, खरीददारी, मुलांना शाळेत सोडणे आदींसाठी ४ तास घालवतो जी आपल्या जीवनातील १२.५ वर्ष असतात.
म्हणून २४ तासापैकी, जवळपास २० तास (८० ते ८५%) आपण आपल्या घर आणि कार्यस्थळात खर्च करतो. यासाठी दोन्ही स्थळ सर्वांच्या आयुष्यात महत्वपूर्ण भूमिका निभावतात.